Friday, January 6, 2012

Field of gold

प्रसंगानंतर प्रसंग आठवत आहेत ... त्याचा गंध अजुन इतके दिवस झाले तरी आठवत राहतो त्याचा माझ्याशेजारी असणा किती सुन्दर होता ते ... तो सूर्यास्त सगळा अंधारून आला होता त्या दिवशी ... खोलीत पण अंधुक उजेड होता आणि फक्त त्याचा असणा जाणवत होता मला बाकी काहीच नाही ... त्याचा उबदार स्पर्श... आम्ही दोघेही कितीतरी वेळ शांतच होतो ॥ तो तर बहुतेक झोपला पण होता पण मी जागा होतो त्याचा अस्तित्व मला झोप येउन देण शक्यच नव्हता त्याच्या मानेपाशी वर खाली होणारी शीर, त्याचा श्वास आणि त्याचा गंध बाकी कशाचच अस्तित्व उरला नव्हता
नंतर कधीतरी तो जागा झाला आणि काही वेळानी मी बाहेर बघितला balcony च्या काचेच्या दारामधून त्या संध्याकाळी अचानक ढग बाजूला झाले होते आणि एक वेगालाच सुवर्ण प्रकाश समोरच्या उंच झाडांच्या माथ्यावर पडला होता ... ते काले ढग , त्यांच्या पुढ्यात ती उंच झाडा आणि त्यांच्या वरचा तो कोवला सोनेरी प्रकाश आणि त्याचा अस्तित्व आणि मी... it was field of gold for me...

No comments:

Post a Comment