Monday, April 5, 2010

Aadhi Beej ekale

आधी बीज एकले ... आधी बीज एकले ..डोक्यात या ओळी येत आहेत ॥ तुकाराम बुवा तल्लीन होउन गात आहेत ॥ डोळ्या समोर संत तुकाराम चित्रपट येतो ॥ मग देहु येता ..आणि मग गावची पालखी आठवते ॥ ते वातावरण समोर उभा राहत.... पाउस पडून गेल्या मुले सगळीकड़े हिरवा झाला आहे , नुक्ताच पाउस पडून गेला आहे खाली चांगला चिखल झाला आहे .. टाळ आणि मृदुन्गाचे आवाज कधीचे येत आहेत आजू बाजूला जाम गर्दी आहे .. वाराकरयांचे पांढरे कपडे , रंगित साड्या .. पिताली वृंदावना .. सगळा एकच म्हणून दिसते ॥ पालखी अजुन आलेली नाहीये ..आणि मी वाट बघतोय पालखीची ..आणि हे सगळा इथे आठवत आहे .. इथे ऑफिस मधे .. समोर लैपटॉप आहे साइड ला coffee चे कप पडले आहेत .. आजू- बाजूला एकदम शांतता .. इतकी की अगदी तुमच्या पोटातल्या प्रत्येक हालचालीचा आवाज घुम्तोय की काय असा वाटावा .. शेजारी पाजारी.. गोरी लोक बसली आहेत (दिसत कोणी नाही , पण आहेत बहुतेक )आणि आपल्या डोक्यात तुकाराम बुवा ॥ इतका वेगला , विरुद्ध कुठेच काही सम्बन्ध नाही कुठे होतो आपण आणि आत्ता कुठे आहोत असा विचार येतो ... आणि नंतर एकदम चमकता ॥ नंतर कुठे असू कोण जाणे?

No comments:

Post a Comment